Sanghavi Def Hub

Sanghavi Def Hub Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Sanghavi Def Hub, Chemical company, Nasik, Nashik.

टॅरिफ वॉर, जिओपॉलिटिकल तणाव आणि डॉलरचा वाढलेला दर — या तिन्हींचा फटका सर्वसामान्यांना दिसत नाही, पण AdBlue / DEF / Techn...
31/01/2026

टॅरिफ वॉर, जिओपॉलिटिकल तणाव आणि डॉलरचा वाढलेला दर —

या तिन्हींचा फटका सर्वसामान्यांना दिसत नाही, पण AdBlue / DEF / Technical Urea सारख्या इंडस्ट्रियल व्यवसायांना आतून हादरवून सोडतोय.

AdBlue / DEF हे फक्त एक केमिकल नाही — BS-IV व BS-VI डिझेल वाहनांसाठी ते प्रदूषण नियंत्रणाचं अनिवार्य घटक आहे. त्याचा बेस आहे high-purity urea, आणि urea चा बेस आहे ammonia — ज्यासाठी natural gas हा मुख्य इनपुट. म्हणजे energy market हलली की DEF chain थेट हलते.

आज परिस्थिती अशी आहे की एकीकडे जागतिक tariff war आणि निर्बंधांच्या राजकारणामुळे energy supply chain अस्थिर झाली आहे. दुसरीकडे United States कडून Russia आणि Iran कडून energy products — crude oil, nitrogen feedstock, natural gas — याबाबत आयात करण्यासाठी अप्रत्यक्ष-प्रत्यक्ष दबाव वाढतो. त्यामुळे Import contracts महाग, insurance महाग, shipping risk जास्त.

त्यावर भर म्हणजे डॉलरचा वाढलेला दर. Raw material डॉलरमध्ये, freight डॉलरमध्ये, insurance डॉलरमध्ये — पण भारतीय market मध्ये selling price तितक्या वेगाने वाढवता येत नाही. Margin कागदावर दिसतो, प्रत्यक्षात वितळतो.

याचा परिणाम: — Technical grade urea cost unstable
— Ammonia linkage contracts risky
— DEF / AdBlue production cost वाढलेली
— Working capital अडकलेले
— Price volatility मुळे dealer-customer trust disturb
— Small manufacturers वर सर्वात जास्त दाबात

कागदावर “green mobility” आणि “clean fuel” च्या घोषणा आहेत, पण ground वर pollution control chain च geopolitics वर अवलंबून आहे — ही वस्तुस्थिती आहे.

उद्योग चालवणाऱ्यांना प्रश्न पडतो: जर energy inputs राजकीय दबावाखाली असतील, डॉलर सतत महाग होत असेल, आणि import routes अनिश्चित असतील — तर pollution control products परवडणाऱ्या किमतीत कसे द्यायचे?

स्वच्छ हवा हवी असेल, तर supply chain पण स्वायत्त आणि सुरक्षित करावी लागेल — नाहीतर AdBlue / DEF / industrial urea क्षेत्रात पुढचे धक्के अजून बाकी आहेत.

टीप - Industrial Urea मुळे प्रभावित होणारे मुख्य उद्योग
1️⃣ Plywood / MDF / Furniture
Urea-formaldehyde resin वापरतात
बोर्ड, laminate, furniture bonding cost वाढते
2️⃣ AdBlue / DEF (BS-VI vehicle segment)
Truck, bus, diesel car SCR systems
DEF cost वाढली = transport cost वर indirect परिणाम
3️⃣ Resin & Adhesive Industry
Industrial glues, binders
Construction & packaging sector ला फटका
4️⃣ Pharma & Cosmetics
High-purity urea creams, formulations
Input cost sensitive segment
5️⃣ Chemical & Explosives
Mining, infra blasting chemicals
Nitrogen chain disturb झाली तर cost वाढ
6️⃣ Textile & Dye Industry
Dyeing auxiliaries, finishing chemicals
Process chemical cost वाढ
7️⃣ Pollution Control Equipment
SCR / NOx reduction systems
Power plants, heavy industry compliance cost वाढ

सचिन संघवी

Address

Nasik
Nashik
422009

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sanghavi Def Hub posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share