Babasaheb Naik College of Engineering, Pusad - Official

  • Home
  • India
  • Pusad
  • Babasaheb Naik College of Engineering, Pusad - Official

Babasaheb Naik College of Engineering, Pusad - Official Babasaheb Naik College of Engineering, Pusad is one of the best Engineering institutions in the Maharashtra State, India.

08/03/2016

पुसद (जि. यवतमाळ) - अभियांत्रिकीचे शिक्षण घेताना मिसरुड फुटलेल्या कोवळ्या मुलांची "अण्णा कॅन्टीन‘चे मालक राजू बोजेवार यांनी पालकाच्या भूमिकेत काळजी घेतली. हीच मुले मोठी झाल्यावर दूरदेशी गेली. एकेदिवशी अचानक अण्णाची हलाखीची परिस्थिती "फेसबुक‘वर उमटली; अन्‌ सारी तरुणाई एकवटली. काही तासांतच मदतीची "पोस्ट‘ पुढे आली. अण्णाच्या बॅंक अकाउंटमध्ये 92 हजारांची रक्कम जमा झाली. तरुणाईने अण्णाच्या ऋणानुबंधांची अनोखी उतराई केली.
माणुसकीचा संस्कार प्रतिबिंबित करणारी ही घटना आहे, बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयातील "ऍल्युमनी‘ तरुणाईची. महाविद्यालयाच्या स्थापनेसोबतच 1983 मध्ये कारला रोडवर राजू बोजेवार यांनी कॅन्टीन सुरू केली. त्यावेळी दिल्ली, हरियाना, पंजाब, राजस्थान, जम्मू-कश्‍मीर अशा भारताच्या विविध भागांतून विद्यार्थी अभियांत्रिकी शिक्षण घेण्यासाठी पुसदला येत. त्यांना चहा, नाश्‍ता राजूअण्णा करीत. बरेचदा मुलांकडे पैसे नसत. मात्र, अण्णांनी उधारीच्या वहीकडे कधी बघितले नाही. मोठ्या प्रेमाने खाऊ घालताना अडचणीत सापडलेल्या मुलांना त्यांनी पैसेही पुरविले. 1990-91च्या दंगलीत अण्णांनी मुलांना मोठा आधार दिला. त्यांच्या या प्रेमळपणामुळे मुलेही अण्णांच्या कॅन्टीनभोवती पिंगा घालत. ऋणानुबंधाच्या गाठी जुळल्यानंतर बी. ई. डिग्री पूर्ण होताच अण्णांची कॅन्टीन सोडणे मुलांना कठीण जाई. पंजाबच्या चरणजितसिंह मिनास हे या अण्णा कॅन्टीनचे फॅन होते. ते सध्या अमेरिकेत सॉफ्टवेअर कंपनीचे मालक आहेत. गंमत म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ओबामा यांच्याशी त्यांनी करार केला आहे. याच मिनास यांनी पुसदच्या अण्णा कॅन्टीनच्या आठवणी "अण्णाज कॅन्टीन‘ या इंग्रजी पुस्तकातून जागवल्या. या पुस्तकाचे प्रकाशन त्यांनी 2012मध्ये बीएनसीओई ऍल्युमनी मिटमध्ये केले. अशी ही अण्णांची कॅन्टीन तरुणाईच्या मनात घर करून होती. दरम्यान, ऍल्युमनी मिटचे समन्वयक प्रा. राजेश पाचकोर पिरेड आटोपल्यावर गेल्या आठवड्यात अण्णा कॅन्टीनवर गेले. तिथे तेच राजूअण्णा चहा घेऊन आले. त्यांनी चहा दुसऱ्या कॅन्टीनवर गरम करून आणल्याचे लक्षात येताच प्रा. पाचकोर यांनी त्यांची चौकशी केली. आर्थिक परिस्थिती डबघाईला आल्याचे कळले, तेव्हा पाचकोरही चिंतित झाले. एकेकाळी मुलांना मदतीचे हात देणारे राजूअण्णा मागे कसे? त्यांना मदतीची गरज असल्याचे लक्षात आले. पाचकोर यांनी अण्णांचा कॅन्टीनसह फोटो मोबाईलमध्ये क्‍लिक केला. बीएनसीआई ऍल्युमनी फेसबुकवर अपलोड केला. त्यांनी आर्थिक मदतीचे आवाहन केले. तोच किती मदतीची गरज आहे? अशी विचारणा केली. 80 हजार रुपयांत राजू कॅन्टीन चालवू शकतात, असे फेसबुकच्या पोस्टवरून कळताच अवघ्या पाच तासांत राजू बोजेवारच्या खात्यात 92 हजार 500 रुपये एवढी रक्कम जमा झाली. ऍल्युमनी मिटचे समन्वयक व सहकारी प्रा. श्रीराम माहुरे, प्रा. संजय महाजन यांनी या कामी पुढाकार घेतला. फेसबुकवरील ऍल्युमनीच्या प्रतिसादाने राजूअण्णा अक्षरश: भारावून गेले. तरुणाईच्या उतराईने ऋणानुबंधाच्या गाठी अधिक घट्ट झाल्या. प्रा. पाचकोर यांनी राजूने व्यक्त केलेल्या आभारांचा व्हिडिओ फेसबुकवर अपलोड केला, तसा उंचावलेल्या अंगठ्यांचा फेसबुकच्या वॉलवर पाऊस पडला. त्याहीपुढे जाऊन नाईक अभियांत्रिकीचा 1988 बॅचचा माजी विद्यार्थी समशेर राणा यांनी दिल्लीत अण्णांना बोलावून घेतले. राणा यांचे दिल्लीत मोठे बस्तान आहे. ते शिक्षणक्षेत्रातील प्रसिद्ध प्रवेश समुपदेशक आहेत. राणांनी अण्णांना जागा, पैसा व राहण्याची सोय उपलब्ध करून दिली असून अण्णांनी आजच ट्रेनने दिल्ली गाठली आहे. माजी विद्यार्थ्यांच्या या आपुलकीने संस्थाध्यक्ष जय नाईक, प्राचार्य डॉ. हमेशबाबू नानवाला भारावले व त्यांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

23/10/2014

Wish you one and all a very Happy Diwali.

28/10/2011

Address

Pusad
445204

Alerts

Be the first to know and let us send you an email when Babasaheb Naik College of Engineering, Pusad - Official posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share