Sahakar Maharshi Akluj

Sahakar Maharshi Akluj 7200 TCD Sugar Manufacturing Plant & 33 Mw co-generation project , Acetic Acid, Distillery, ENA etc by products

अकलूजच्या  मोफत आरोग्य शिबीराचा  १२७५ रुग्णांना लाभ.युवानेते सयाजीराजे मोहिते पाटील यांच्या संकल्पनेतून पार पडले आरोग्य ...
09/08/2026

अकलूजच्या मोफत आरोग्य शिबीराचा १२७५ रुग्णांना लाभ.

युवानेते सयाजीराजे मोहिते पाटील यांच्या संकल्पनेतून पार पडले आरोग्य शिबीर

कै.श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या मोफत आरोग्य शिबिरामध्ये ७६५ महिला व ५१० पुरूष अशा एकूण १२७५ रुग्णांनी लाभ घेतला असून त्यामध्ये तालुक्यातील लगतच्या तालुक्यातील रुग्णांनी लाभ घेतला. अकलूजचे नगरसेवक युवानेते सयाजीराजे मोहिते- पाटील यांच्या संकल्पनेतून सदरचे शिबिर संपन्न झाले.
जिजामाता कन्या प्रशाला, अकलूज येथे आयोजित केलेल्या मोफत आरोग्य शिबिराचे उद्घाटन माजी उप मुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी सहकार महर्षी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील, शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालिका स्वरुपाराणी मोहिते पाटील, कार्यक्रमाचे आयोजक व अकलूज नगर परिषदेचे नगरसेवक युवा नेते सयाजीराजे मोहिते पाटील, डॉ.एम.के.इनामदार, डॉ.सतीश दोशी, डॉ.अपर्णा सरवदे, बार्शी , डॉ.सुरेश सूर्यवंशी, डॉ.अमोल शिंदे, डॉ.सचिन सावंत, डॉ.सविता गुजर, डॉ.रेवती राणे, डॉ.अपूर्व गिरमे, डॉ.जोत्स्ना गायकवाड, डॉ.भूषण चंकेश्वरा, डॉ.विश्वास कदम, डॉ.रावसाहेब गुळवे, डॉ.साईराज भोंगळे, डॉ.अरुंधती खराडे पाटील, डॉ.अभिजीत राजेभोसले, सहकार महर्षि कारखान्याचे कार्यकारी संचालक सुहास यादव, शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव, अभिजित रणवरे, सहसचिव, हर्षवर्धन खराडे-पाटील, विविध संस्थांचे संचालक व इतर मान्यवर उपस्थित होते.
सयाजीराजे मित्र मंडळ अकलूज, शंकरराव मोहिते-पाटील चॅरिटेबल हॉस्पिटल ट्रस्ट,शंकरनर अकलूज, शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज, सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखाना लि .,शंकरनगर-अकलूज, नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल, बार्शी, उपजिल्हा रुग्णालय, अकलूज व प्राथमिक आरोग्य केंद्र, शंकरनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या शिबिरात कर्करोग, नेत्ररोग, अस्थिरोग, हृदयरोग व रक्त तपासण्या करण्यात आल्या.
प्रस्ताविकात शिबिराचे आयोजक सयाजीराजे मोहिते पाटील म्हणाले, देशात ग्रामीण भागात कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. महिलांमध्ये स्तनाचा व गर्भाशयाच्या कर्करोगाचे प्रमाण अधिक आहे. दरवर्षी सुमारे तीन लाखांहून अधिक महिला या आजाराने बाधीत होतात. त्यांच्या मनातील भीती दूर व्हावी, आजाराचे निदान झाल्यास पुढील उपचार वेळेत मिळावेत. त्यांचा जीव वाचावा व कर्करोगासह महिलांच्या नेत्ररोग, अस्थिरोग, हृदयरोग व रक्ताच्या सर्व मोफत तपासण्या व्हाव्यात यासाठी या शिबिराचे आयोजन केले असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ.एम.के.इनामदार म्हणाले, रुग्णांच्या मनातील कर्करोगाची भीती घालवण्यासाठी व त्यांच्यावर मोफत उपचारासाठी अशा शिबिराची अत्यंत गरज आहे. या शिबिरातून एखाद्या रूग्णाचे प्राण वाचले तरी शिबिराचे यश आहे.
डॉ.रेवती राणे म्हणाल्या, श्रीमती स्व. रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील यांचे सामाजिक कार्य मोठे होते. समाजातील महिला कौटुंबिक जबाबदारी पार पडताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. या शिबिरामुळे महिलांची आर्थिक बचत होणार असल्याने शिबिराचे आयोजक सयाजीराजे मोहिते पाटील यांनी एक स्तुत उपक्रम राबवल्याचे त्यांनी सांगितले.
या आरोग्य शिबिरास श्री.मदनसिंह मोहिते-पाटील, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, अकलूज, सौ.सुलक्षणादेवी जयसिंह मोहिते-पाटील व श्री.दीपकराव खराडे-पाटील, श्री.प्रदीपराव खराडे-पाटील यांनी भेट दिली.
या तपासण्यानंतर रुग्णांना १५ दिवसांची मोफत औषधे शंकरराव मोहिते पाटील चॅरिटेबल हॉस्पिटल ट्रस्टच्या वतीने देण्यात आली तसेच भविष्यात ट्रस्टच्या वतीने गरजू रुग्णांना डोळ्यांची मोफत शस्त्रक्रिया (मोतीबिंदू) करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले, आभार डॉ.अभिजीत राजेभोसले यांनी मानले.

03/08/2026
09/07/2026
सहकार महर्षि शंकरराव मोहिते- पाटील सहकारी साखर कारखाना लि., शंकरनगर- अकलूज या साखर कारखान्याच्या वतीने जागतिक पर्यावरण द...
05/06/2026

सहकार महर्षि शंकरराव मोहिते- पाटील सहकारी साखर कारखाना लि., शंकरनगर- अकलूज या साखर कारखान्याच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आज शुक्रवार दि.०५/०६/२०२६ रोजी शेती विभागीय कार्यालय, लवंग येथे वृक्षारोपण, कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान (ए. आय.), ऊस शेती चर्चासत्र व सभासद स्मार्ट कार्ड वितरण कार्यक्रम मा.सयाजीराजे मोहिते-पाटील, संचालक तथा नगरसेवक, अकलूज नगरपरिषद यांचे शुभहस्ते संपन्न झाला.
कारखान्याचे मार्गदर्शक संचालक मा.श्री.विजयसिंह मोहिते-पाटीलसाहेब, माजी उप मुखमंत्री, महाराष्ट्र राज्य व चेअरमन मा.श्री.जयसिंह मोहिते-पाटीलसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याची वाटचाल प्रगतीपथावर चालू आहे.
मा.सयाजीराजे मोहिते- पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना पर्यावरणाचे संरक्षणाकरिता लोकांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून वृक्ष लागवडीचे महत्त्व पटवून दिले.
शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (ए.आय.) या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेणे ही काळाची गरज असल्याचे सांगून कारखान्याने प्रायोगिक तत्त्वावर सभासदांना स्मार्ट कार्डचे वितरण केले असून त्याचे सभासदांना होणारे फायदे, वेळेची बचत, त्वरित माहिती मिळणे याबाबत सभासद व शेतकरी यांना माहिती दिली.
सदर कार्यक्रमास मा.शंकरराव माने-देशमुखसाहेब, व्हॉईस चेअरमन, कारखान्याचे आजी माजी संचालक, डॉ.समाधान सुरवसे व डॉ.तुषार शितोळे, शास्त्रज्ञ, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे, डॉ.तुषार पोळ, कृषी विज्ञान केंद्र, बारामती, सभासद, शेतकरी, कारखान्याचे कार्यकारी मा.श्री.सुहास यादव व इतर मान्यवर मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.

सहकार महर्षि कारखान्याच्या वतीने वृक्षारोपन कार्यक्रम संपन्नसहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखाना लि, शं...
11/05/2026

सहकार महर्षि कारखान्याच्या वतीने वृक्षारोपन कार्यक्रम संपन्न

सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखाना लि, शंकरनगर-अकलूज येथे मा.चि.सयाजीराजे संग्रामसिंह मोहिते-पाटील, संचालक शिवसृष्टी किल्ला व शिवछत्रपती मल्टीमेडिया लेझर शो कमिटी व नगरसेवक, नगरपरिषद अकलुज यांचे शुभहस्ते कारखाना परिसरामध्ये वृक्षारोपन कार्यक्रम सोमवार दि.11/05/2026 रोजी सकाळी 10.30 वा. संपन्न झाला.
कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष सहकार महर्षि कै.शंकरराव मोहिते-पाटील उर्फ काकासाहेब यांनी कारखाना स्थापनेपासून कारखाना परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करुन त्याचे संवर्धन केलेले आहे. त्याचा पर्यावरण समतोल व लाभ आज रोजी या परिसरामध्ये होत आहे. तसेच कारखान्याचे मार्गदर्शक संचालक मा.श्री.विजयसिंह मोहिते-पाटील, माजी उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य तसेच कारखान्याचे चेअरमन मा.श्री.जयसिंह मोहिते-पाटील व संचालिका मा.स्वरुपाराणी जयसिंह मोहिते-पाटील यांचे नेतृत्वाखाली मा.चि.सयाजीराजे संग्रामसिंह मोहिते-पाटील यांच्या संकल्पनेतून व प्रेरणेतून जागतिक स्तरावरती वाढत चाललेल्या तापमानाच्या भीषण समस्येस अनुसरुन यावर्षीपासून कारखाना परिसर, कामगार कॉलनी उपलब्ध मोकळ्या विविध जागेमध्ये मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या जातीचे वृक्षारोपन करणेत आले आहे. कारखाना परिसरात यामुळे पर्यावरण पूरक वातावरणाची काळजी व सामाजीक बांधिलकीच्या दृष्टीने या मोहिमे अंतर्गत नियोजनबध्द प्रयत्न सुरु आहेत. साधारणत: कारखाना व केनयार्ड परिसरामध्ये विविध झाडांचे वृक्षारोपन करणेत आलेले असून शेती विभाग कडून याचे नियोनबध्द संगोपन व देखभाल केली जात आहे. तसेच कारखान्याचे विविध ठिकाणचे विभागीय कार्यालय येथे 5 जून पर्यावरण दिनी तसेच या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करणेचा मनोदय मा.सयाजीराजे मोहिते-पाटील यांनी व्यक्त केला.
सदर कार्यक्रमप्रसंगी कारखान्याचे सेक्रेटरी अनिल काटे, चिफ् अकौंटंट वाय.बी.इनामदार, मुख्य शेतकी अधिकारी आर.एस.चव्हाण, सिव्हील इंजिनिअर एस.ए.शेखर, स्टोअर किपर बी.व्ही.सावंत, आय.टी.मॅनेजर एस.जे.नरसाळे, पर्यावरण अधिकारी पी.एच.इनामदार, लेबर ऑफिसर एस.एम.साळुंखे, परचेस ऑफिसर आर.एस.गायकवाड,गॅरेज इन्जार्ज बी.आर.इनामदार व विविध विभागाचे सेक्शन इन्चार्ज, कामगार संचालक जयवंत माने-देशमुख व युनियन प्रतिनिधी तसेच शेती विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती उत्साहात साजर...
19/02/2026

सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती उत्साहात साजरी

सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याच्या वतीने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक 'श्री छत्रपती शिवाजी महाराज" यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त गुरूवार दिनांक १९/०२/२०२६ रोजी सकाळी ८:३० वाजता श्री शिवपार्वती देवालय, शंकरनगर येथील छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याचे विधिवत पूजन करून पुष्पहार अर्पण करणेचा सोहळा कारखान्याच्या संचालिका मा. कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील व मा.सयाजीराजे संग्रामसिंह मोहिते-पाटील, संचालक तथा नगरसेवक, अकलूज नगरपरिषद, अकलूज यांचे शुभहस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

सहकार महर्षि कारखान्याचे मार्गदर्शक संचालक मा.श्री. विजयसिंह शंकरराव मोहिते-पाटील, माजी उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य तसेच कारखान्याचे चेअरमन मा.श्री. जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांचे नेतृत्वाखाली दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांचे जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

सदर कार्यक्रमास कारखान्याचे व्हाईस चेअरमन मा.श्री.शंकरराव माने-देशमुख, संचालक मा.श्री.लक्ष्मण शिंदे,मा.श्री.विराज निंबाळकर,मा.श्री.रामचंद्र ठवरे व शिवसृष्टी किल्ला व शिवछत्रपती मल्टिमेडीया लेजर शो कमिटी संचालक मा.श्री.पांडूरंग एकतपुरे, मा.श्री.बाळासाहेब माने-देशमुख, मा.श्री.दत्तात्रय चव्हाण,मा.श्री.धनंजय सावंत, मा.श्री.नामदेव चव्हाण,मा.श्री.धनंजय दुपडे, मा.श्री.अनिलराव कोकाटे, मा.सौ. हर्षाली निंबाळकर, माजी संचालक मा.श्री.भिमराव काळे,मा.श्री.भारत फुले,मा.श्री.शिवाजीराव सिद, मा.श्री.बाळासाहेब पवार,मा.श्री.मोहनराव लोंढे, मा.श्री.धनंजय चव्हाण तसेच कार्यकारी संचालक मा.श्री.राजेंद्र चौगुले व खातेप्रमुख, अधिकारी, पत्रकार बंधु, कार्यलक्षी संचालक, मा.श्री.जयवंत माने-देशमुख तसेच सर्व कामगार व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Address

Shankarnagar
Akluj
413118

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sahakar Maharshi Akluj posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Sahakar Maharshi Akluj:

Shortcuts

Share