19/02/2025
श्री. तेजस आणि श्री. पुष्कर निंबाळकर, माळेगांव, ता. बारामती, हे दोघे बंधू आपल्या कंपनीने बनवलेल्या ईबॉक्सचा वापर करून मागील चार वर्षापासून थेट ग्राहकांना देवगड तालुक्यातून हापूस आंब्याची संपूर्ण भारतात विक्री करत आहेत.
खास आंब्याच्या भरणी साठी बनवलेला प्लास्टिक फोल्डेबल ईबॉक्स यशस्वीरित्या वापरल्याबद्दल श्री. निंबाळकर बंधूंचे आम्ही एक्सपर्ट ऍग्रोकेम लिमिटेड अभिनंदन करून आभार मानत आहोत.. 💐💐🙏
“२५ पेट्यांपासून सुरू केलेला प्रवास, आज १२ हजार पेट्यांच्या विक्रीपर्यंत – तेजस निंबाळकर यांची यशोगाथा”
पुणे: बारामती तालुक्यातील माळेगाव बु. या छोट्याशा गावात राहणाऱ्या तेजस विठ्ठलराव निंबाळकर यांनी आपल्या जिद्दीच्या जोरावर स्वतःचा यशस्वी व्यवसाय उभा केला आहे. दहावीच्या परीक्षेनंतर स्वतःच्या पायावर उभं राहण्याची तीव्र इच्छा असलेल्या तेजस यांनी केवळ २५ आंब्याच्या पेट्यांपासून व्यवसायाला सुरुवात केली आणि आज त्यांचा व्यवसाय दरवर्षी १० ते १२ हजार पेट्यांपर्यंत पोहोचला आहे.
सुरुवातीला ही एक छोटी संकल्पना होती, परंतु लॉकडाऊनच्या काळात त्यांनी ऑनलाइन विक्रीच्या माध्यमातून या व्यवसायाला मोठं रूप दिलं. महाराष्ट्राच्या अस्सल देवगड-रत्नागिरी हापूस आंब्याला योग्य ओळख मिळावी आणि बनावट आंब्यांच्या विक्रीला आळा बसावा यासाठी त्यांनी “कुणकेश्वर आंबा सप्लाय” या नावाने व्यवसाय सुरू केला.
आज महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांसह इतर राज्यांमध्येही त्यांचा हापूस पोहोचत आहे. शेतकऱ्यांकडून करार पद्धतीने आंबा खरेदी करून तो थेट ग्राहकांच्या घरी ४८ तासांच्या आत पोहोचवण्याची व्यवस्था त्यांनी केली आहे. त्यांच्या मेहनतीच्या जोरावर तेजस यांचा व्यवसाय आता लाखो ग्राहकांचा विश्वास संपादन करू लागला आहे.
“ही केवळ आंब्याची विक्री नाही, तर महाराष्ट्राच्या पारंपरिक वारशाची खरी ओळख आहे,” असं म्हणणारे तेजस आज हजारो कुटुंबांना रोजगारही उपलब्ध करून देत आहेत. त्यांच्या संघर्षाची आणि मेहनतीची ही यशोगाथा अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
अस्सल देवगड-रत्नागिरी हापूस हवे असल्यास, आजच संपर्क साधा!
मोबाईल नं : 9028600875
—————————————————————
कोकणातील अस्सल देवगड-रत्नागिरी हापूससाठी एक विश्वासार्ह नाव – 🥭 कुणकेश्वर आंबा सप्लायर 🥭
✅ गेल्या 7 वर्षांपासून ग्राहकांच्या सेवेत
✅ GI रजिस्टर नंबर – AU/21311/GI/139/1605
आजच ग्राहक, विक्रेता किंवा फ्रेंचायझी नोंदणी करा!
🔹 शेतकरी ते ग्राहक / विक्रेता – थेट वाजवी दरात हापूस आंबा!
🔹 अस्सल GI टॅग असलेल्या उत्पादकांकडूनच आंबा खरेदी करा, फसवणूक टाळा!
🔹 बाजारात हापूसच्या नावाखाली कर्नाटक-केरळचा आंबा विकला जातो, सावध राहा!
🔹 उत्तम प्रतीचा आंबा योग्य दरात उपलब्ध!
🔹 महाराष्ट्रभर कुठेही जलद आणि सुरक्षित ट्रान्सपोर्ट सुविधा!
🥭 अस्सल देवगड-रत्नागिरी हापूस हवे असल्यास, आजच संपर्क साधा! 🥭
मोबाईल नं : 9028600875