MGM Krishi Vigyan Kendra, Gandheli, Aurangabad - MH

MGM Krishi Vigyan Kendra, Gandheli, Aurangabad - MH Conducting on-farm testing to identify the location specificity of agricultural technologies under va

22/04/2025

Hon'ble Union Minister of Agriculture Shri. Shivraj Singh Chavan has visited Brazil narrated various technologies of Agriculture in Brazil

एमजीएम कृषि विज्ञान केंद्र, गांधेली येथे शेतकऱ्यांसाठी कृषी चौपाल कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपणदर महिन्याच्या दुसऱ्या शनिवा...
12/04/2025

एमजीएम कृषि विज्ञान केंद्र, गांधेली येथे शेतकऱ्यांसाठी कृषी चौपाल कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण

दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी डीडी किसान वरून प्रसारित केला जाणारा कार्यक्रम कृषी चौपाल. या कार्यक्रमाचा पाचवा भाग १२ एप्रिल २०२५ रोजी दुपारी २:०० ते ३:०० वाजेपर्यंत डीडी किसान वरून प्रसारित झाला असून सदरील कार्यक्रमास एकूण ३५ लाभार्थी उपस्थित होते. शास्त्रज्ञ आणि शेतकरी समुदाय यांच्यातील दुवा मजबूत करणे आणि शेतकऱ्यांच्या दाराशी वैज्ञानिक माहिती उपलब्ध करून देणे व शेतकऱ्यांना त्यांच्या समस्या स्वतः सोडवण्यास मदत करता यावी या उद्देशाने कृषी चौपाल कार्यक्रमाचे प्रसारण केले आहे.

वाढत्या तापमानामुळे व वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामुळे पिकात, फळबागेत, भाजीपाला व फुल पिकात आवश्यकतेनुसार सकाळी किं...
08/04/2025

वाढत्या तापमानामुळे व वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामुळे पिकात, फळबागेत, भाजीपाला व फुल पिकात आवश्यकतेनुसार सकाळी किंवा सायंकाळी पाणी व्यवस्थापन करावे.

वाढत्या तापमानामुळे आपल्या पशुंना उन्हामध्ये बांधू नका. पशुंना शक्यतो थंड, स्वच्छ व मुबलक पाणी दिवसातून दोन-तीन वेळेस पा...
08/04/2025

वाढत्या तापमानामुळे आपल्या पशुंना उन्हामध्ये बांधू नका. पशुंना शक्यतो थंड, स्वच्छ व मुबलक पाणी दिवसातून दोन-तीन वेळेस पाजावे. ऊन्हांमुळे पशुंच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणार नाही याची दक्षता घ्यावी.

काढणीस तयार असलेल्या भाजीपाला, टरबूज, खरबूज पिकांची काढणी करून घ्यावी. भाजीपाला पिकात खुरपणी करून भाजीपाला पीक तन विरहित...
08/04/2025

काढणीस तयार असलेल्या भाजीपाला, टरबूज, खरबूज पिकांची काढणी करून घ्यावी. भाजीपाला पिकात खुरपणी करून भाजीपाला पीक तन विरहित ठेवावे. नवीन लागवड व पूर्ण लागवड केलेल्या रोपांना आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. भाजीपाला (मिरची, वांगे व भेंडी) पिकात रसशोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्यांच्या व्यवस्थापनासाठी पायरीप्रॉक्सिफेन ५% व फेनप्रोपाथ्रीन १५% १० मिली किंवा डायमेथोएट ३०% १३ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

काढणीस तयार असलेल्या आंबा फळांची काढणी लवकरात लवकर करून घ्यावी. आंबा बागेत आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे व जमिनीती...
08/04/2025

काढणीस तयार असलेल्या आंबा फळांची काढणी लवकरात लवकर करून घ्यावी. आंबा बागेत आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे व जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी तसेच जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी आंबा फळझाडाच्या आळ्यात अच्छादन करावे. नवीन लागवड केलेल्या आंब्याच्या रोपांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी रोपांना सावली करावी आंबा बागेत जिब्रालिक ऍसिड १ ग्राम प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

काढणीस तयार असलेल्या हळद पीकाची काढणी करून घ्यावी. काढणी केलेल्या हळद पीकाची उकडणे, वाळवणे व पॉलीश करणे ही कामे करून माल...
08/04/2025

काढणीस तयार असलेल्या हळद पीकाची काढणी करून घ्यावी. काढणी केलेल्या हळद पीकाची उकडणे, वाळवणे व पॉलीश करणे ही कामे करून मालाची सुरक्षित ठिकाणी (गोदामात) साठवणूक करावी.

ऑक्टोबर हिटमुळे सध्या तापमानात वाढ झाली असुन अरोग्यासाठी जास्तीत जास्त पाणी प्यावे व आहारात ताज्या ताकाचा व पातळ पदार्था...
10/10/2024

ऑक्टोबर हिटमुळे सध्या तापमानात वाढ झाली असुन अरोग्यासाठी जास्तीत जास्त पाणी प्यावे व आहारात ताज्या ताकाचा व पातळ पदार्थाचा समावेश करावा. तसेच रात्री झोपताना थंड दुधात गुलकंद मिसळून पिल्यास लाभदायक ठरेल.

एमजीएम, केव्हीके, गांधेली, छत्रपती संभाजीनगर.

सोयाबीन पिकाची पेरणी सर्व प्रकारच्या जमिनीत करता येते. परंतु अत्यंत हलक्या जमिनीत अपेक्षित उत्पादन मिळत नाही. जास्त आम्ल...
24/05/2024

सोयाबीन पिकाची पेरणी सर्व प्रकारच्या जमिनीत करता येते. परंतु अत्यंत हलक्या जमिनीत अपेक्षित उत्पादन मिळत नाही. जास्त आम्लयुक्त, क्षारयुक्त तथा रेताड जमिनीत सोयाबीनचे पीक घेऊ नये. सोयाबीन लागवडीसाठी मध्यम ते भारी उत्तम निचऱ्याची, सेंद्रिय कर्बाची मात्रा चांगल्या प्रमाणात असलेली जमीन निवडावी. जमिनीचा सामू 6.5 ते 7.5 च्या दरम्यान असणे गरजेचे आहे.

पशुधन व्यवस्थापनतापमानात वाढ झाल्यामूळे दूधाळ जनावरांमध्ये दुध उत्पादन कमी होते व त्याचबरोबर दुधातील स्निग्ध पदार्थ व प्...
24/05/2024

पशुधन व्यवस्थापन

तापमानात वाढ झाल्यामूळे दूधाळ जनावरांमध्ये दुध उत्पादन कमी होते व त्याचबरोबर दुधातील स्निग्ध पदार्थ व प्रथिने यांचे प्रमाण कमी होते. हया पासून दुधाळ जनावरांचे संरक्षण करण्यासाठी त्यांच्या गोठ्याच्या शेड वरील छताला स्प्रिंकलर्स किंवा फॉगर्स ने थंडावा निर्माण करावा, दुपारी जनावरांना धुवून काढावे, जमलेच तर पंखा किंवा कुलर्सची व्यवस्था शेड मध्ये करावी, शेडच्या बाजूला पोत्याचे पडदे बांधून त्यांना भिजवावे. गोठ्याची उंची कमीत कमी मध्यभागी 15 फुट उंच असावी. पशुधनास पिण्यास भरपूर पाणी द्यावे.

शंखी गोगलगाय व्यवस्थापनशेतात लवकरात लवकर खोल नांगरणी करून घ्यावी. त्यामूळे जमिन तापन्यास मदत होऊन किडींचे कोष व घातक बूर...
24/05/2024

शंखी गोगलगाय व्यवस्थापन

शेतात लवकरात लवकर खोल नांगरणी करून घ्यावी. त्यामूळे जमिन तापन्यास मदत होऊन किडींचे कोष व घातक बूरशीचा नायनाट होईल. ज्या भागात मागील वर्षी शंखी गोगलगायीचा प्रादूर्भाव आढळून आला होता अशा ‍ठिकाणी शंखी गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी उन्हाळ्यात (मे महिन्यात) जमिनीची खोल नांगरट करावी जेणेकरून गोगलगायीच्या सूप्तावस्था नष्ट होतील.

गोवंशीय पशुधनांमध्ये लंम्पी स्कीन रोगाचा प्रादुर्भाव अत्यंत वेगाने होत आहे. याची सर्वात जास्त झळ लहान वयातील वासरांना जा...
30/08/2023

गोवंशीय पशुधनांमध्ये लंम्पी स्कीन रोगाचा प्रादुर्भाव अत्यंत वेगाने होत आहे. याची सर्वात जास्त झळ लहान वयातील वासरांना जाणवत असून मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. अशा वेळी नियंत्रणासाठी व त्यांची शारीरिक प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी.

१. वासरांना चीक पाजवा

२. वयाच्या सातव्या दिवशी जंतनाशक औषधीची मात्रा द्यावी

३. महाराष्ट्र शासन यांच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार लसीकरण करून घ्यावे

४. आजारी आणि निरोगी वासरे, गोधन स्वतंत्रपणे विलगीकरण करावे

५. सर्वात महत्त्वाचे म्हणजे २०% सुश्रुषा व ८०% काळजी (ज्यामध्ये पाणी, सकस चारा, जखमांची सुश्रुषा इत्यादी) गोष्टी कराव्यात

६. “माझे पशुधन माझी जबाबदारी” या सुत्रानुसार आपल्या गोवंशीय पशुधनाची या कालावधीमध्ये जास्तीत जास्त काळजी घ्यावी.

एमजीएम कृषि विज्ञान केंद्र, औरंगाबाद. 6360025964 / 7038758111

Address

Pardari Road
Aurangabad
431007

Opening Hours

Monday 9am - 5:30pm
Tuesday 9:30am - 5:30pm
Wednesday 9:30am - 5:30pm
Thursday 9:30am - 5:30pm
Friday 9:30am - 5:30pm
Saturday 9:30am - 5:30pm

Telephone

+919404997772

Alerts

Be the first to know and let us send you an email when MGM Krishi Vigyan Kendra, Gandheli, Aurangabad - MH posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to MGM Krishi Vigyan Kendra, Gandheli, Aurangabad - MH:

Share