15/08/2024
माझ्या ओमकार इंजिनिअरिंग, प्लॉट क्रमांक D-187/2, फाइव स्टार एमआयडीसी शेंद्रा या युनिटला महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा उद्योग केंद्र, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने उत्कृष्ट जिल्हा उद्योजक पुरस्कार मिळालेला आहे. हा पुरस्कार 15 ऑगस्ट 2024 रोजी, संभाजीनगर येथे, माननीय पालकमंत्री अब्दुल सत्तार साहेब यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्कार मिळाल्याबद्दल मान्यवर खासदार संदीपानजी भुमरे साहेब, संजयजी शिरसाट साहेब, आणि माझी खासदार इम्तियाज जलील साहेब यांनी व्यक्तिशः भेटून अभिनंदन केले. याबद्दल मी सर्वांचा मनापासून आभारी आहे. हा पुरस्कार माझ्या ओमकार इंजिनिअरिंग/ओमकार ग्रुपच्या सर्व सहकारी आणि कर्मचार्यांच्या सहकार्यामुळे मिळालेला आहे, त्यामुळे त्यांचेही मनापासून आभार मानतो. भविष्यातही असेच सहकार्य मिळावे अशी अपेक्षा व्यक्त करतो.
- श्री सुधाकर गायकवाड