29/07/2026
🟥🟥
*डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली आणि प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्था, आंबव, देवरुख यांच्यात महत्त्वपूर्ण सामंजस्य करार संपन्न*
👉 *उद्योजकता, नावीन्यपूर्ण संशोधन आणि स्टार्टअप इकोसिस्टमला मिळणार मोठी चालना*
*देवरूख-* प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्था, आंबव, देवरुख आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांच्यात दि. २८ जुलै रोजी एक अत्यंत महत्त्वाचा सामंजस्य करार दापोली कृषी विद्यापीठात संपन्न झाला. विद्यार्थी आणि प्राध्यापकांमध्ये उद्योजकता, संशोधन आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने हा करार एक मोठा मैलाचा दगड ठरणार आहे.
या सामंजस्य कराराचा मुख्य उद्देश विद्यापीठ आणि संस्था परिसरामध्ये उद्योजकता, नाविन्यपूर्ण उपक्रम, संशोधनाचे व्यापारीकरण आणि स्टार्टअप इनक्युबेशनला प्रोत्साहन देण्यासाठी एक संयुक्त व्यासपीठ निर्माण करणे हा आहे. या कराराअंतर्गत प्रामुख्याने सल्लागार सेवा, संयुक्त प्रकल्प, संयुक्त संशोधन, प्राध्यापक आणि विद्यार्थी विनिमय कार्यक्रम इनक्युबेशन अशा महत्त्वपूर्ण क्षेत्रांमध्ये दोन्ही संस्था मिळून काम करणार आहेत. या भागीदारीतून संस्थेच्या सर्व महाविद्यालयांना एक सुसज्ज स्टार्टअप इकोसिस्टम उभारण्यासाठी इनक्युबेटरला भक्कम पाठबळ दिले जाईल.
तर या इनक्युबेटरच्या माध्यमातून विद्यार्थी, प्राध्यापक आणि बाहेरील नवउद्योजकांना उद्योग उभारणीसाठी आवश्यक असणारे मार्गदर्शन, इनक्युबेशन आणि सर्वतोपरी उद्योजकीय मदत पुरवली जाणार आहे. हा करार दोन्ही संस्थांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. संजयजी भावे, संशोधन संचालक डॉ. पी. यु. शहारे, शिक्षण संचालक डॉ. सतीश एस. नारखेडे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. संजय तोरणे, कुलसचिव श्री. उमेशजी चंडिवडे, जैवतंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. एस. व्ही. सावर्डेकर, प्रक्षेत्र संचालक डॉ. अरुण माने, विद्यापीठाचे अभियंता श्री. राहुलजी घाडगे, कृषी रसायन आणि मृदा विज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. मनीष कस्तुरे आणि संशोधन उपसंचालक डॉ. वैभव राजेमहाडिक आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच, प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रद्युम्न आर. माने, NRIF च्या संचालिका सौ. ईशानी वाघ, राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत आणि इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी साडवलीचे प्राचार्य डॉ. अमोल बी. खाडे उपस्थित होते. या करारामुळे तंत्रज्ञान, कृषी आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील विद्यार्थ्यांन