PYROSYN INDUSTRIES

PYROSYN INDUSTRIES PYROSYN INDUSTRIES was established in the year 2014 . We are leading manufacturer of AGRO CHEMICALS . We are in excellent in B2B Marketing .

Chemical formulating procedure are controlled by our highly skilled professionals in most hygienic environment.

26/08/2025

पिकातील “मर” रोग नियंत्रण –

१. झिंक आणि फेरसची भूमिका:
झिंक आणि फेरस हे पिकांसाठी अत्यंत महत्वाचे सूक्ष्म अन्नद्रव्ये आहेत.
ज्या जमिनीत झिंकची कमतरता असते, अशा जमिनीत पिकांमध्ये विल्टिंग (मर रोग) ची समस्या अधिक गंभीर होते.
मातीतील झिंक आणि फेरसची पातळी संतुलित ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि पिकांचे आरोग्य चांगले राहते.

२. जमिनीत पोषणासाठी सुक्ष्मअन्नद्रव्ये:
झिंक सल्फेट: 10 किलो प्रती एकर
फेरस सल्फेट: 10 किलो प्रती एकर
कॉपर सल्फेट: 2-3 किलो प्रती एकर
या खतांचे मिश्रण जमिनीतून दिल्यास मातीतील झिंक, फेरस आणि कॉपरची पातळी संतुलित राहते आणि रोग नियंत्रणास मदत होते.

३. मृत किंवा रोगग्रस्त रोपे:
ज्या ठिकाणी रोपे मरुन गेली आहेत, त्या ठिकाणी खालील उपाय करा:
कॉपर ऑक्सिक्लोराईड: 3-4 ग्रॅम/लि.
मॅन्कोझेब: 3-4 ग्रॅम/लि.
दोन्ही पदार्थ एकत्र करून मृत किंवा रोगग्रस्त रोपांच्या आसपास जास्त प्रमाणात ड्रेचिंग करावी.
गरज पडल्यास 10 दिवसांनी ही प्रक्रिया पुन्हा करा.

४. जैविक उपाय (Beneficial Microbes):
पिकांच्या आरोग्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी खालील जैविक जीव वापरावेत:
बॅसिलस सबटिलिस (Bacillus subtilis)
सुडोमोनास फ्लुरोसन्स (Pseudomonas fluorescens)
मायकोरायझा (Mycorrhiza)
ह्या जैविक जीवांचा प्रत्येक २०-२५ दिवसांनी २ वेळा वापर करा.

५. सुक्ष्मअन्नद्रव्यांचा वापर:
पिकांस दर महिन्याला मिक्स सुक्ष्मअन्नद्रव्ये 2 किलो प्रति एकर प्रमाणात द्यावीत.
हे पिकांच्या वाढीस आणि रोग प्रतिकारशक्तीस उपयुक्त ठरते.

६. रोगनिवारक फवारणी (Fungicides):
पिकांवर खालील औषधांचा आलटून-पालटून फवारणी करावी:
मेटालॅक्झिल (Metalaxyl)
ट्रायसायक्लाझोल (Triadimefon)
बावीस्टिन (Bavistin)
या औषधांचे योग्य अंतराळ राखून वापरणे महत्वाचे आहे, जेणेकरून रोगावर नियंत्रण मिळेल.

७. पाण्याचे व्यवस्थापन:
पिकांना हलकासा पाण्याचा ताण द्यावा, जास्त किंवा अचानक पाण्याचा फेरबदल टाळावा.
रोप विल्टिंग मधे सुरवातीच्या लक्षणांत पिकांस पुरेसे पाणी देवुन देखिल त्यावर पाण्याचा ताण दिसतो, परंतु रोगग्रस्ततेवर लक्ष देऊन पाणी देणे टाळा.
पिकांना दररोज २ तास किंवा अचानक ५-६ तास पाणी असा मोठा फेरबदल टाळा.

८. सुरवातीपासून रोग प्रतिबंधक उपाय:
पुढच्या वर्षी हाच रोग येऊ नये यासाठी सुरुवातीपासूनच ट्रायकोडर्मी, मायकोरायझा, पीएसबी, नत्र स्थिर कऱणारे जीवाणू (जेणे करुन अमोनिकल नत्राचा पुरवठा होईल, व युरिया कमी वापरावा लागेल) चा वापर करा.

ज्याठिकाणी रोग दरवर्षी गंभीर होतो, अशा ठिकाणी पिकाच्या वाढीच्या दरम्यान २ ते ३ वेळा (पिकाच्या कालावधी नुसार, दोन डोस मधे 20-30 दिवसांचे अंतर रोगाच्या तिव्रतेनुसार) बॅसिलस, सुडोमोनास चा वापर करावा.

९. झिंक आणि फेरसची खात्री:
पिकांस झिंक सल्फेट आणि फेरस सल्फेट नियमितपणे वापरणे अत्यावश्यक आहे.

हे पिकांना पोषण देते, रोग प्रतिकारशक्ती वाढवते आणि विल्टिंग कमी करते.

शक्य होईल तितका प्रयत्न करा की पिक फेरपालट करता येईल. वारंवार एकच पिक किंवा त्या परिवारातील इतर पिके जर सतत एकाच जागी घेतली गेली तर हि समस्या सोडविण्याच्या पलिकडे देखिल जावु शकते. पिकांस खतांचा वापर करत असतांना त्यात संतुलन साधुन वापर करावा.

Address

Plot No A-12, MIDC, Palkhed Tal Dindori
Dindori
420009

Alerts

Be the first to know and let us send you an email when PYROSYN INDUSTRIES posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to PYROSYN INDUSTRIES:

Share