Tejas Ajit Upadhye

Tejas Ajit Upadhye BE-Civil engineer
contractor

सहकार, साखर कारखाने बदनाम करणाऱ्या लोकांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी ली अडचणीच्या काळात मदतीला सर्वप्रथम धावून हे सहकार आले...
23/04/2021

सहकार, साखर कारखाने बदनाम करणाऱ्या लोकांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी ली अडचणीच्या काळात मदतीला सर्वप्रथम धावून हे सहकार आले आहे. महाराष्ट्र समृध्द का आहे तर इथे सहकार आहे. अडचणीच्या काळात हक्काने उभा राहणारा माणसं आहेत म्हणून. सांगली, कोल्हापूर येथे पुर आला होता त्या वेळी याच सहकार ने याच साखर कारखान्यांनी लोकांना आधार दिला होता. हेच शरद पवार साहेब विरोधात असूनही भक्कम पूर परिस्थिती मध्ये लोकांच्या साठी उभा होते. आजही हेच सहकार, हीच कारखाने लोकांच्या साठी ऑक्सिजन तयार करत आहेत.

केंद्र सरकारने कितीही अडचणी निर्माण केल्या तरीही गुजरातमधील भूकंपात खंबीरपणे उभा राहणारा शरद पवार नावाचा बाप माणूस महाराष्ट्रातील जनतेला वाचवण्यासाठी खंबीर आहे. महाराष्ट्र उगाच शरद पवार साहेब यांच्यावर जीवापाड प्रेम करत नाही. हा माणूस संकटात नक्की धावून देतो हे इतर कोणालाही जमत नाही!

यड्राव येथील शामराव पाटील (यड्रावकर) पतसंस्थेस शासनाची मान्यतायड्राव–(प्रतिनिधी)                        येथील सहकार महर्...
28/08/2020

यड्राव येथील शामराव पाटील (यड्रावकर) पतसंस्थेस शासनाची मान्यता

यड्राव–(प्रतिनिधी)
येथील सहकार महर्षी शामराव पाटील (यड्रावकर) ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या, यड्राव या पतसंस्थेस शासनाच्या सहकार विभागाची मान्यता मिळाली.

या संस्थेच्या माध्यमातून परिसरातील उद्योजक,लघु उद्योजक,शेतकरी,व्यापारी कामगार वर्ग व सर्वसामान्य जनतेचे जीवनमान उंचविण्यासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करुन देऊन त्यांचे जीवन मान उंचावताना त्यांचे एक वेगळे स्थान निर्माण करण्यासाठी या संस्थेच्या माध्यमातून त्यांना उभारी देण्याचे काम केले जाईल,तसेच ठेवीदारांचे हित जोपासण्यासाठी संस्था सदैव तत्पर राहील.तसेच संस्थेची वाढ व भरभराट याकडे तत्परतेने लक्ष देवून संस्था चांगल्याप्रकारे नावारुपास येईल याकडे विशेष प्रयत्न करणार असल्याचे संस्थेचे संस्थापक चेअरमन आदित्य राजेंद्र पाटील (यड्रावकर) यांनी सांगितले.

सदर संस्थेच्या नोंदणी कामी जयसिंगपूर नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष संजय पाटील (यड्रावकर) व सहाय्यक निबंधकसो शिरोळ प्रेम राठोडसो यांचे मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे चेअरमन आदित्य राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी शेवटी सांगितले.

03/08/2020

#रक्षाबंधन....
बहिणभावाच्या अतुट नात्याचा पविञ सण.बहिणीच्या सुख दुःखात पाठीशी उभा रहणारा,तिच्या सुखी आयुष्यासाठी स्वतःच्या आयुष्याशी तडजोड करणारा,तिच्या रक्षणाची जबाबदारी पेलणारा,लहानपणापासुनच हातात हात घेउन मी तुझ्या प्रत्येक क्षणाला बरोबर आहे म्हणत वडिलां ची भुमिका बजावणारा,अशा माझ्या सर्व भाऊरायांना समृद्ध,सुखी व आरोग्यदायी आयुष्य लाभु देत.

सर्वांना रक्षाबंधन निमित्त हार्दिक शुभेच्छा..!

माझ्या दाढीत जेवढे केस आहेत,तेवढी बहुजनांची पोरंशिकविण #शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवा...
09/05/2020

माझ्या दाढीत जेवढे केस आहेत,तेवढी बहुजनांची पोरं
शिकविण #शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील
यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन..!💐

27/04/2020

कोरोनाशी लढताना दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यु झाला.त्यांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपये व सरकारी नोकरी देण्याची घोषणा गृहमंत्री Anil Deshmukhजी यांनी केली.

याबद्दल त्यांचे मनापासून आभार.कोरोनाविरोधातील लढाईत ग्राऊंडवर काम करणाऱ्या प्रत्येक घटकाच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे आहे.

10/03/2020

धुलीवंदन अर्थात धुळवड खेळताना शक्यतो कोरडे रंगच वापरा. पाण्याचा अपव्यय टाळा. नैसर्गिक रंगांनाच प्राधान्य द्या.
#माझ्या सर्व बंधू भगिनींना धुलीवंदनच्या मन:पूर्वक शुभेच्छा ! ! !

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार यांची विधान परिषदेच्या सभागृह नेतेपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर...
24/02/2020

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार यांची विधान परिषदेच्या सभागृह नेतेपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.....
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

#विधिमंडळअधिवेशन

काल रात्री (२९जुलै ) ९ वाजता साहेबांच्या जिभेच आणि घशाच ऑपरेशन झालं आणि साहेबांनी आज (३० जुलै ) हर्षवर्धन पाटील यांच्या ...
30/07/2019

काल रात्री (२९जुलै ) ९ वाजता साहेबांच्या जिभेच आणि घशाच ऑपरेशन झालं आणि साहेबांनी आज (३० जुलै ) हर्षवर्धन पाटील यांच्या विधानगाथा या पुस्तक प्रकाशन सोहळा समारंभा साठी १२ मिनिट ५५ सेकंद च मनोगत केलं.

साहेब कुठून येती एवढी ऊर्जा...?

हा आमचा ७८ वर्षाचा तरुण, कार्यकर्त्यांना १० हत्तीचं बळ देतोय.
#उर्जास्त्रोत

22/07/2019
वीर सेवा दल व सामाजिक कामामध्ये आघाडीवर असणारे आमचे मिञ मा.राकेश चौगुले सावकर यांना वाढदिवसाच्या मनापासुन शुभेच्छा..
03/07/2019

वीर सेवा दल व सामाजिक कामामध्ये आघाडीवर असणारे आमचे मिञ मा.राकेश चौगुले सावकर यांना वाढदिवसाच्या मनापासुन शुभेच्छा..

आमचे मिञ, कोल्हापुर जिल्हा युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष,  यशस्वी उद्योगजक मा. रोहितदादा पाटील यांना  वाढदिवसाच्या हार्दिक ...
29/06/2019

आमचे मिञ, कोल्हापुर जिल्हा युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष, यशस्वी उद्योगजक मा. रोहितदादा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा...

महाराष्ट्र राज्याचे माजी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील दादांचा (२७ जून) वाढदिवस आहे. विद्...
26/06/2019

महाराष्ट्र राज्याचे माजी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील दादांचा (२७ जून) वाढदिवस आहे. विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष असल्यापासून दादा विद्यार्थीहितासाठी झटत आहेत. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस संघटनेचे प्रदेशाध्यक्ष असताना संग्राम दादांनी समकालीन प्रश्नांवर उत्तमरीत्या काम केले. विद्यार्थ्यांचे विशेषतः भीषण दुष्काळात होरपळत असलेल्या विद्यार्थ्यांचे प्रश्न हिरीरीने हाताळले.

विद्यार्थी किंवा युवक संघटनेची धुरा सांभाळत असताना संघटनेत शिस्त असली पाहिजे. आपण हाती घेतलेले विषय हे विधायक तसेच पक्ष, जनहिताचे असले पाहिजेत, याची खबरदारी घ्यावी लागते. आंदोलन करताना संसदिय मार्गाने जावे लागते. अन्यथा याचा तोटा पक्षाला सहन करावा लागतो. मला नमूद करायला आनंद वाटतोय की संग्राम दादांनी दोन वर्षाच्या काळात या गोष्टींची खबरदारी घेतली.

प्रदेश स्तरावरील मुंबईतील बैठका वगळल्या तर जास्तीत जास्त वेळ ग्राऊंडवर काम करण्यास संग्राम दादांनी प्राधान्य दिले. संघटनाबांधणीत अडचण आल्यास तक्रार करत बसण्यापेक्षा सुसंवादातून त्यातून मार्ग काढणे, ही त्याची जमेची बाजू आहे.

आदरणीय पवार साहेबांनी स्वतः याबद्दल जाहीर कार्यक्रमात संग्राम दादांचे कौतुक केलेले आहे. विद्यार्थी आणि युवक हे प्रत्येक राजकीय पक्षाचे आधारस्तंभ असतात. ते मजबूत, विवेकनिष्ठ होतील याकडे सतत लक्ष दिले पाहिजे.

मी दादांच्या सोबत वर्षाभरापुर्वी साविञीबाई फुले विद्यापिठ वर मोर्चा माझ्या विद्यार्थी मिञ,मैञीणींना न्याय मिळवुन देण्यास यशस्वी प्रयत्न केला.आजही माझी दादांची आधुन मधुन भेट होतेचं

पक्षाची विचारधारा जास्तीत जास्त विद्यार्थी व युवकांपर्यंत पोहोचावी, अशी सदिच्छा मी संग्राम दादांना वाढदिवसानिमित्त देतो...

शुभेच्छुक :- तेजस अजित उपाध्ये

Address

Jaysingpur
416101

Telephone

+917350100863

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Tejas Ajit Upadhye posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Tejas Ajit Upadhye:

Share