Mahavitaran Kolhapur

Mahavitaran Kolhapur Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Mahavitaran Kolhapur, Tarabai Park Zone Office, Kolhapur.

27/08/2026
कोल्हापूर परिमंडल राज्यात रोल मॉडेल करा - परेश भागवतमहावितरणच्या कार्यकारी संचालकांचे आढावा बैठकीत आवाहनमानव संसाधन विभा...
25/08/2026

कोल्हापूर परिमंडल राज्यात रोल मॉडेल करा - परेश भागवत

महावितरणच्या कार्यकारी संचालकांचे आढावा बैठकीत आवाहन

मानव संसाधन विभागाचाही घेतला आढावा

कोल्हापूर/ सांगली, दि. २५ ऑगस्ट २०२६ : ‘स्मार्ट मीटर बसविण्यात कोल्हापूर परिमंडलाने राज्यात आघाडी घेतली आहे. कोल्हापूर परिमंडलात १०० टक्के स्मार्ट मीटर बसवून रोल मॉडेल बनविण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम करा’, असे आवाहन महावितरणचे कार्यकारी संचालक (देयक व महसूल / मानव संसाधन) परेश भागवत यांनी केले. कोल्हापूर परिमंडलातील ‘ऊर्जा शक्ती सभागृहात’ झालेल्या आढावा बैठकीवेळी ते बोलत होते.

यावेळी कोल्हापूर परिमंडलाचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर, कोल्हापूरचे अधीक्षक अभियंता गणपत लटपटे, सांगलीचे अधिक्षक अभियंता अमित बोकील, सहा. महाव्यवस्थापक (मासं) शशिकांत पाटील, सहा. महाव्यवस्थापक (विवले) विजय गुळदगड, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी शिरीष काटकर, संगणक व प्रणाली विश्लेषक बाळकृष्ण पाटील यांच्यासह कार्यकारी अभियंते उपस्थित होते.

यावेळी बोलताना परेश भागवत म्हणाले, ‘मीटरचे रीडिंग, फोटो व्हेरिफिकेशन आणि बिलिंगमध्ये कोणतीही त्रुटी राहणार नाही व ग्राहकांनी वापरलेल्या विजेचे योग्य बिलिंग होईल याची काळजी घ्या. स्मार्ट मीटरच्या माध्यमातून अहवालाच्या आधारे वीज चोरांवर कारवाई करा. सध्या कोल्हापूर परिमंडल अंतर्गत कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात मिळून सुमारे ७० टक्के स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत. ५४ उपविभागांपैकी २६ उपविभागांमध्ये ७० टक्क्यांपेक्षा अधिक स्मार्ट मीटर बसविण्यात आले असून, नेसरी व पन्हाळा या दोन उपविभागांमध्ये १०० टक्के स्मार्ट मीटर बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. यामुळे ग्राहकांच्या तक्रारींचे प्रमाण नगण्य झाले आहे.

ते पुढे म्हणाले, परिमंडळात ९० टक्क्यांपेक्षा अधिक स्मार्ट मीटर बसलेल्या उपविभागांमध्ये ग्राहकांना महिन्याच्या १ तारखेलाच वीजबिल उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न करा. औद्योगिक वीज ग्राहकांचे रीडिंग प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेला घेण्याच्या दृष्टीने नियोजन करा. महसूल वेळेत प्राप्त होणे महत्त्वाचे असून, बिलिंग आणि वसुलीची प्रक्रिया अधिक प्रभावी करा. बिलिंग व रीडिंग यंत्रणेची प्रत्यक्ष तपासणी करण्यासाठी परिमंडल आणि मंडल स्तरावर स्वतंत्र पथके तयार करून नियमित तपासणी करा. बिलिंगमध्ये हलगर्जीपणा होऊन महावितरणचे आर्थिक नुकसान झाल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर गंभीर कारवाई केली जाईल, असा इशारा परेश भागवत यांनी दिला.

यावेळी परेश भागवत यांनी मानव संसाधन विभागाचा आढावा घेऊन सेवापुस्तिका, बदल्या, गोपनीय अहवाल, मनुष्यबळ प्रशिक्षण, सुरक्षा, उच्च वेतनश्रेणी व अनुकंपाच्या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. बैठकी नंतर विविध कर्मचारी संघटना व मीटर रीडिंग एजन्सीच्या प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधला.

25/08/2026
24/08/2026

विद्युत क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा राष्ट्रीय गौरव!

विद्युत क्षेत्रातील प्रदीर्घ आणि उल्लेखनीय योगदानाची दखल घेत, महावितरणचे संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांना 'एमिनेंट इंजिनियर’ या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महसूलमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा पुरस्कार प्रदान केला.
संचालक श्री. राजेंद्र पवार यांचे ज्ञान, अनुभव आणि कार्यनिष्ठेचा हा सन्मान महावितरणसाठी अभिमानाचा क्षण आहे. श्री. राजेंद्र पवार यांचे मनःपूर्वक अभिनंदन!

21/08/2026

स्मार्ट मीटरद्वारे वीज वापराबाबत अधिक माहिती मिळवूया, अनावश्यक वापर टाळूया आणि ऊर्जा संवर्धनात योगदान देऊया.

20/08/2026

मनामनांतील अंतर दूर करत, प्रेम, शांतता आणि बंधुभावाच्या मूल्यांना बळ देऊया. एकसंध आणि समतामूलक समाजाच्या निर्मितीसाठी संकल्पबद्ध होऊया. महावितरण परिवारातर्फे सद्भावना दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Address

Tarabai Park Zone Office
Kolhapur
416003

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mahavitaran Kolhapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share