Krantiagrani Dr G D Bapu Lad Sahakari sakhar Kharkhana ltd. Kundal

  • Home
  • India
  • Kundal
  • Krantiagrani Dr G D Bapu Lad Sahakari sakhar Kharkhana ltd. Kundal

Krantiagrani Dr G D Bapu Lad Sahakari sakhar Kharkhana ltd. Kundal क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना मर्या. कुंडल'चे अधिकृत पेज

मा. क्रांतीअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांची दूरदृष्टी व शेतकरी, कामगार यांचे विषयी असणारी तळमळ तसेच त्यांचे मार्गदर्शनाखाली व मा. अरुण (अण्णा) लाड यांच्या अथक प्रयत्नातून या साखर कारखान्याची उभारणी झाली असून, यशस्वी वाटचाल चालू आहे.

कारखान्यांची नोंदणी दिनांक १२/०५/१९९७ रोजी झालेली असून, कारखान्याचे कार्यक्षेत्रातील ७१ गांवांमधील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची उस्फुर्तपणे शेअर्सची खरेदी करून शासनाच

े नियमप्रमाणे १०% शेअर भाग भांडवल रु ४८०.०० लाख रुपये जमा केले आहेत.शासनाचे भागभांडवल रु १४४०.०० लाख वेळत प्राप्त झाले असून ६०% कर्ज उभारणीपैकी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक व सहभाग कर्ज योजनअंतर्गत १२ बँकेकडून रु २४००.०० कर्ज उभारणी केली व उर्वरित कमी पडणारी कर्जाची रक्कम रु ४८०.०० लाख शेतकऱ्यांकडून ठेवींच्या स्वरूपात गोळा केली आहे.आमच्या कारखान्यात सहभागी योजनेअंतर्गत रु २४००.०० लाख कर्ज रकमेची परतफेडीची मुदत दिनांक ३१/०३/२०१० होती.

सध्या कारखान्याचे चेअरमन मा. शरद लाड यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याची यशस्वी वाटचाल सुरु आहे.आधुनिक अपक्रम आणि नवनवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कारखाना आणि त्यामधून शेतकरी विकाकासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

गुणवत्तेची परंपरा यशाचे शिखरSCIA International Awards 2026 मध्ये“सर्वोत्कृष्ट साखर पुरस्कार”आपल्या क्रांतिअग्रणी डॉ. जी....
05/04/2026

गुणवत्तेची परंपरा यशाचे शिखर

SCIA International Awards 2026 मध्ये

“सर्वोत्कृष्ट साखर पुरस्कार”

आपल्या क्रांतिअग्रणी डॉ. जी.डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना लि., कुंडल यांना जाहीर झाल्याबद्दल कारखान्याचे चेअरमन, संचालक, व्यवस्थापन, सभासद शेतकरी यांचे

हार्दिक अभिनंदन

SCIA International Awards 2026 मध्ये“सर्वोत्कृष्ट साखर पुरस्कार”आपल्या क्रांतीअग्रणी डॉ. जी.डी. बापू लाड सहकारी साखर कार...
05/04/2026

SCIA International Awards 2026 मध्ये

“सर्वोत्कृष्ट साखर पुरस्कार”

आपल्या क्रांतीअग्रणी डॉ. जी.डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना कुंडल लि., यांना जाहीर झाल्याबद्दल कारखान्याचे चेअरमन, संचालक, व्यवस्थापन, सभासद शेतकरी यांचे

हार्दिक अभिनंदन

आज क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखानाच्या २०२५–२६ च्या  गळीत हंगामाचा सांगता समारंभ मोठ्या उत्साहात ...
18/02/2026

आज क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखानाच्या २०२५–२६ च्या गळीत हंगामाचा सांगता समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.
या प्रसंगी कारखान्याचे चेअरमन शरद (भाऊ) लाड यांनी सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गाच्या अथक परिश्रमामुळे हा हंगाम यशस्वी ठरला असे प्रतिपादन केले. सहकार, एकता आणि प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत कारखाना नवनवीन यशशिखरे गाठत आहे.

बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना लि., मरळी ता. पाटणचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी क्रांती सहकारी साखर कारखान्यास स...
02/01/2026

बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना लि., मरळी ता. पाटणचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी क्रांती सहकारी साखर कारखान्यास सदिच्छा भेट दिली. यावेळी सहकार चळवळ व कारखानदारी अधिक बळकट करण्यावर सकारात्मक चर्चा झाली.

#सहकार_चळवळ #साखर_कारखाना #सदिच्छा_भेेट #क्रांती_साखर_कारखाना #बाळासाहेब_देसाई_कारखाना #मरळी #पाटण

सर्वांना इंग्रजी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ! हे नववर्ष आपणांस व आपल्या कुटुंबियांना सुख-समृद्धीचे आणि आरोग्यदायी जावो...
01/01/2026

सर्वांना इंग्रजी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ! हे नववर्ष आपणांस व आपल्या कुटुंबियांना सुख-समृद्धीचे आणि आरोग्यदायी जावो, हीच सदिच्छा !

[Happy New Year 2026, New Year Resolutions, New Year Wishes]

Vibes

क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना लि., कुंडलचे माजी व्हा. चेअरमनकै. भिमराव चंद्रु महिंद–पाटील (नाना...
20/12/2025

क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना लि., कुंडलचे माजी व्हा. चेअरमन
कै. भिमराव चंद्रु महिंद–पाटील (नाना)
यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने सहकार क्षेत्रात एक अनुभवी, कर्तव्यदक्ष व मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व हरपले आहे. त्यांचे कार्य, नेतृत्व व समाजासाठी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो व कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो, हीच प्रार्थना.
भावपूर्ण श्रद्धांजली.

व्हीएसआय प्रशिक्षणासाठी "क्रांती"चे 40 शेतकरी रवानावसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे ऊस शेती प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित के...
15/12/2025

व्हीएसआय प्रशिक्षणासाठी "क्रांती"चे 40 शेतकरी रवाना
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे ऊस शेती प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला आहे. यासाठी क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याचे 40 शेतकरी आज पाठविणेत आले. ऊस विकास कार्यक्रम राबविणेबरोबरच, शेतकरी ऊस शेतीतील अद्यावत तंत्रज्ञानाने प्रशिक्षित व्हावा या हेतूने दरवर्षी संशोधन केंद्राला शेतकरी भेटींचे आयोजन केले जाते. यावेळी कारखान्याचे सभासद, अधिकारी, एसटी डेपोचे अधिकारी ओंकार अदाटे यांचेसह इतर मान्यवर उपस्थित होते.

#क्रांती #शेतकरीप्रशिक्षण #ऊसशेती #ऊसविकास #सहकारीसाखरकारखाना #शेतकरीकल्याण #कृषीप्रशिक्षण #आधुनिकशेती #शेतीतंत्रज्ञान #कृषीसंशोधन

युगपुरुष, भारतरत्न, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी कोटी कोटी प्रणाम! त्यांच...
06/12/2025

युगपुरुष, भारतरत्न, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी कोटी कोटी प्रणाम! त्यांचे विचार आणि कार्य सदैव प्रेरणा देत राहील.





#संविधान #समता #महापरिनिर्वाण_दिन

04/12/2025

क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांच्या जयंतीनिमित्त दिला जाणारा 2025 सालचा क्रांतिअग्रणी पुरस्कार मा. डाॅ. नरेंद्र जाधव, सचिव, नियोजन समिती, भारत सरकार यांना मा. चंद्रकांत दळवी, चेअरमन, रयत शिक्षण संस्था, सातारा यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.
पुरस्कार मूर्ती मा. डाॅ. नरेंद्र जाधव म्हणाले की, तुम्ही काय करता त्यापेक्षा तुम्ही ते कसे करता हे महत्त्वाचे आहे. प्रत्येक गोष्टींसाठी संघर्ष करत रहा. कोणत्याही क्षेत्रात काम करा पण त्या क्षेत्रात सर्वोत्तम बनण्याचा प्रयत्न करीत रहा.
कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रकांत दळवी म्हणाले की, कुंडल हे स्वातंत्र्य संग्रामातील अग्रणी गाव होते.
यावेळी सौ. वसुंधरा नरेंद्र जाधव यांच्यासह अनेक मान्यवर व क्रांती कुटुंबीयांवर प्रेम करणारे कार्यकर्ते उपस्थित होते.

Address

Kondalvitha Road
Kundal
416309

Opening Hours

Monday 8:30am - 6pm
Tuesday 9am - 6pm
Wednesday 9am - 6am
Thursday 9am - 6am
Friday 9am - 6pm
Saturday 9am - 6pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Krantiagrani Dr G D Bapu Lad Sahakari sakhar Kharkhana ltd. Kundal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Krantiagrani Dr G D Bapu Lad Sahakari sakhar Kharkhana ltd. Kundal:

Share