08/08/2022
झिंक चिलेट !! म्हणजेच यील्ड प्रो फर्ट झिंक !!
एक तांत्रिक माहिती सांगतो, त्याआधी झिंक चिलेट म्हणजे काय ? समजून घेऊया. झिंक हा धनभारीत धातू आहे, ज्याचा आपण वेगवेगळ्या स्वरुपात सुक्ष्मअन्नद्रव्य म्हणून उपयोग करतो.
हे मुलद्रव्य जेव्हा जमिनीत सल्फेट स्वरूपात दिलं जातं आणि त्या जमिनीचा सामू जर ७ च्या पुढे असेल म्हणजे अल्कधर्मी असेल तर एक घडामोड होते. अशा परिस्थितीत झिंकची फॉस्फरस या अनायनकडे जास्त ओढ असते.
म्हणुन ते सल्फेट या अनायन म्हणजेच श्रणभारीत मुलद्रव्याला सोडून फॉस्फरस बरोबर घरोबा करते. इथेचं सगळ गणित बिघडतं. आधिच फॉस्फरस उपलब्ध व्हायला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. त्यात आणखी हे एक संकट, कारण तयार झाललं *झिंक फॉस्फेट* हे पाण्यात विरघळत नाहि. म्हणजे काय तर "बाबाहि गेले, आणि दशम्याहि गेल्या" अशी एक जुनी म्हण रूढ आहे.
मग यावर उपाय काय ? तेव्हा चिलेशन तंत्रज्ञानाचा अवलंब करून झिंक चिलेट म्हणजेच झिंक EDTA चा जन्म झाला. हा चिलेटिंग एजेंट झिंक या धातुला घट्ट पकडुन ठेवतो. अगदी ९ पी एच पर्यंत सुध्दा. ज्यावेळी तो मुळाच्या अगदि जवळ येतो तेव्हाच तो त्याला सोडतो आणि तो (झिंक) सुखाने वनस्पतीच्या शरीरात प्रवेश करतो.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि मग हा इडिटिए नावाचा पार्टनर जमिनीत काय करत असेल?
तर जमिनीत उपलब्ध असलेल्या कोणत्याहि धनभारित मुलद्रव्या बरोबर जसे की पुन्हा झिंक किंवा आयर्न, मँगनिज, कॉपर, कॅल्शियम, मॅग्नेशियम यापैका एकाला पकडतो. घट्ट मिठी मारतो. आणि पुन्हा मुळाजवळ पोहचला कि निस्वार्थपणे त्याला सोडून देतो. मुळा द्वारे पिकाने शोषून घेण्यासाठी.
अशा पद्धतीने त्याचं कामकाज बरेच महिणे चालु असतं.
या तंत्रज्ञानाचा काही ठिकाणी विपर्यास होताना दिसुन येतो आहे. स्वस्त घेण्याच्या नादात उलट शेतकऱ्यांना नविनच संकटांना आमंत्रण देण्याची शक्यता नाकारता येत नाहि.
आम्ही यील्ड प्रो अग्रीटेक प्रा. लिमिटेड, नांदुरा च्या वतीने विक्रेते आणि शेतकरी बांधवांना विनंती करतो, कि थोडा खर्च
वाचविण्यासाठी नसती आफत ओढवून घेऊ नका. शास्त्रशुद्ध उत्पादन निर्मिती हाच आमचा पिंड आहे. तेच आमचं शक्तिस्थळ आहे. तीच आमची ओळख आहे.
*यील्ड प्रो झिंक वापरा !! निश्चिंत रहा !!*
धन्यवाद!