SaiiTech Solar Energy

SaiiTech Solar Energy WE ARE SAIITECH SOLAR ENERGY ESTABLISHED 2000-2001, WORKING ON GRID AND OFF SOLAR PV SYSTEM

03/05/2026
26/04/2026

# #

13/04/2026
☀️ *पीएम सूर्य घर मोफत वीज योजना २०२६* ☀️आता वीजबिल विसरा आणि स्वतःची वीज स्वतः तयार करा! SaiiTech Solar Energy सोबत सोल...
13/04/2026

☀️ *पीएम सूर्य घर मोफत वीज योजना २०२६* ☀️

आता वीजबिल विसरा आणि स्वतःची वीज स्वतः तयार करा! SaiiTech Solar Energy सोबत सोलरकडे वळा आणि मिळवा:

✅ ₹७८,००० पर्यंत थेट सरकारी अनुदान.
✅ ९०% पर्यंत सुलभ कर्ज सुविधा.
✅ फक्त ६% व्याजदराने फायनान्स.
✅ ३० वर्षांची परफॉर्मन्स वॉरंटी.

📄 *पूर्ण डॉक्युमेंटेशन आणि इंस्टॉलेशनची जबाबदारी आमची.*

विनामूल्य साईट व्हिजिट आणि कोटेशनसाठी आजच संपर्क साधा!

📞 **7798104104 / 9604434489**
🌐 www.saiitechsolarenergy.com

06/03/2025
27/02/2025
01/01/2025

For proper genration of solar energy must direction and angle very important.

🔆2 मिनिटांत घेऊ  महत्वपुर्ण माहिती!👇😇फ्रॉम:- SAIITECH solar energy, Phaltan🌄🏘️⚪टॉपकॉन तंत्रज्ञान असणारे बायफेशियल  रुफटॉ...
28/12/2024

🔆2 मिनिटांत घेऊ महत्वपुर्ण माहिती!👇😇
फ्रॉम:- SAIITECH solar energy, Phaltan🌄🏘️
⚪टॉपकॉन तंत्रज्ञान असणारे बायफेशियल रुफटॉप सोलर पॅनेलसाठी पॅनेल खालील पृष्ठभागावर व जवळच्या पृष्ठभागांना पांढऱ्या रंगाने रंगवण्याबाबतचे मार्गदर्शन:
✍️ मिलिंद पिसाळ-देशमुख.( मेकॅनिकल इंजिनिअर )

🔆⚪पांढऱ्या पृष्ठभागामुळे सोलर वीज उत्पादन कसे वाढते⁉️
👉टॉपकॉन बायफेशियल सोलर पॅनेल समोरच्या आणि मागच्या दोन्ही बाजूंनी वीज निर्माण करतात. मागची बाजू पृष्ठभागावरून परावर्तित होणारा सूर्यप्रकाश (अल्बीडो प्रभाव) पकडते. पांढऱ्या रंगाचे पृष्ठभाग जास्त सूर्यप्रकाश परावर्तित करतात (उच्च अल्बीडो), ज्यामुळे बायफेशियल पॅनेलचे वीज उत्पादन हे अतिरिक्त वाढते.

🔆⚪परावर्तकता वाढवण्यासाठी मार्गदर्शन
1.⚪ आजूबाजूचे पृष्ठभाग पांढऱ्या रंगाने रंगवा
- शक्य असल्यास, सोलर पॅनेलभोवतीचे भिंती, छताचा जमिनीचा भाग किंवा पॅनेलजवळील सपाट पृष्ठभाग उच्च परावर्तकतेच्या पांढऱ्या रंगाने रंगवा.
- नवीनच पत्रा शेड, पोर्च, फॅब्रिकेशन करून त्यावर सिस्टीम बसवणार असल्यास अशा प्रकारचे सोलर- रिफ्लेक्टिव्ह कोटिंग्स मटेरिअल किंवा कूल रूफ कोटिंग्स वापरा, जे बाहेरच्या हवामानासाठी टिकाऊ असतात आणि जास्त परावर्तकता देतात.

2. ⚪पॅनेलखालील भागावर लक्ष केंद्रित करा.
- सोलर पॅनेल जर उंच माउंट केले असतील तर पॅनेलच्या खालील सपाट पृष्ठभाग पांढऱ्या रंगाने रंगवा. या भागातून परावर्तित होणारा सूर्यप्रकाश पॅनेलच्या मागच्या बाजूस सर्वाधिक प्रभावीपणे पकडला जातो आणि विजेचे उत्पादन अधिक होते.

3. ⚪परावर्तनाला अडथळा होणार नाही याची काळजी घ्या!
- उपकरणे, आजूबाजूची झाडे किंवा इतर वस्तूंनी परावर्तित प्रकाश अडवला जाऊ नये, याची खात्री करा.

4. ⚪रंगीत पृष्ठभागांची स्वच्छता टिकवा!
- धूळ आणि मातीमुळे परावर्तकता कमी होऊ शकते. पृष्ठभाग नियमितपणे गरजेनुसार स्वच्छ करा, जेणेकरून जास्तीत जास्त प्रकाश परावर्तित होईल.

🔆महत्वाच्या गोष्टींची काळजी घ्या जसे की!👇
💡-छताची ताकद: छतावर रंगकाम आणि देखभाल यामुळे येणारा अतिरिक्त भार सहन करण्यास छत सक्षम आहे का, याची खात्री करा.
💡-हवामानाचा प्रतिकार: अशा प्रकारचे रंग निवडा, जे पाणीरोधक व UV-स्थिर असतील, जेणेकरून रंग खराब होणार नाही.
💡-खर्च आणि फायदा:
उदाहरण:- डिसेंबर 2024 कलर चे दर
⚪भिंती व पृष्ठभाग साठी- अप्पेक्स प्रति 10 लिटर बकेट किंमत 2,800 रुपये
⚪पत्रा, धातूचे भाग व फॅब्रिकेशन बॉडीसाठी पांढरा ऑइल पेंट- एसीअन पेंट्स ऑईलपेंट प्रति लिटर 330-350रुपये

🔆पांढऱ्या रंगाने पृष्ठभाग रंगवणे हा ग्राहकांसाठी एक वेळचा स्वखर्च असला तरी, दीर्घकालीन उत्पादनात लक्षणीय वाढ होऊ शकते, विशेषत: आशा प्रकल्पांसाठी जिथे स्थापित 100% वीज निर्मिती क्षमतेचा पुरेपूर वापर होऊ शकतो.

⚪उत्पादनात अपेक्षित वाढ:-
अभ्यासानुसार, पांढऱ्या रंगामुळे पृष्ठभागाची परावर्तकता वाढल्याने बायफेशियल सोलर पॅनेलच्या वीज उत्पादनात 5-30%* पर्यंत वाढ होऊ शकते. याचा फायदा जागेच्या परिस्थिती व इन्स्टॉलेशन साईटच्या लेआउटनुसार ठरतो.

🏘️🔆🌄साईटेक सोलर एनर्जीचे हे मार्गदर्शन पाळून, तुम्ही तुमच्या टॉपकॉन बायफेशियल सोलर पॅनेलमधून मागच्या बाजूस परावर्तित होणाऱ्या प्रकाशाचा पूर्ण लाभ घेत, वीज उत्पादन जास्तीत जास्त करू शकता आणि तुमच्या रुफटॉप सिस्टिम चा 100% कार्यक्षमतेचा वापर करून घेऊ शकता.

📣आम्ही निःशुल्क ऑफर करतो मोफत साईट व्हिजिट ,मार्गदर्शन, आणि सर्वे करून अगदी योग्य कोटेशन.
🔆 सोबतच मिळेल सर्वोत्तम तंत्रज्ञान तेही मार्केटमधील अगदी किफायतशीर दरात!💡तरी 6️⃣0️⃣,0️⃣0️⃣0️⃣ रुपये ते 7️⃣8️⃣,0️⃣0️⃣0️⃣ रुपये सरकारी सबसिडी चा लाभ घेऊन आजच तुमच्या छतावरील सोलर च्या जोडणीप्रक्रिया करण्यासाठी संपर्क करा!
🌄🏘️🌱साईटेक सोलर एनर्जी
Saiitech Solar Energy
📲श्री. कैलास साळुंखे
+919604434489

📍आमचा ऑफिस पत्ता:-
साईटेक सोलर एनर्जी
गाळा नं: 08, मोनिता गार्डन, लक्ष्मीनगर फलटण, 415523 जि. सातारा
With 'SAIITECH'
"Power Your Future with the Sun: Clean, Green, and Infinite Energy"
~धन्यवाद!🌄🏘️🌱🙏

Address

SHOP NO. 08, MONITA GARDEN, NEAR ICICI BANK, LAXMINAGAR, PHALTAN
Phaltan
415523

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when SaiiTech Solar Energy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share