19/01/2025
नमस्कार मित्रांनो,
आज परत एकदा कदाचित मी त्याच विषयावर बोलणार आहे पण ते आवश्यक आहे,
पूर्वीपासून अनेक वेळा आपण तळ्यातल्या बदकाची आणि कुरूप वेड्याची कहाणी आशा भोसलेच्या स्वरात ऐकली आहे, पुण्याचे आय आय ए ची अवस्था सुद्धा त्या तळ्यातल्या कुरूप वेड्या बदकासारखी झाली होती आजूबाजूची जरा बरी बदके सुद्धा त्याला हिणवतं होती, खेळावयासं घेत न्हवते, कोणी स्वतःहून स्पॉन्सर्शिप देत नव्हते, मागावी लागत होती, असणारे सभासद सुद्धा चेष्टा करत होते दुर्लक्ष करत होते व सोबत येत नव्हते त्या कुरूप वेड्याप्रमाणे आपल्या संस्थेची दशा पहावत नव्हती नवीन सभासद येणे तर दूर पण जुने सभासद सुद्धा सोडून दूर जात होते.
पण गेल्या काही दिवसांपासून चित्र बदलले विकास, सितेश , मंगेश, शैलेश व त्यांचे सहकारी यांनी प्रथमच त्या कुरूप वेड्याला जाणीव करून दिली की तो बदक नाही "राजहंस" आहे आणि सगळेच बदलले, त्याची मान ताठ झाली त्याचा आत्मविश्वास वाढला त्याला स्वतःच्या ताकदीची जाणीव झाली आणि तो त्या छोट्या डबक्यातून मोठ्या सरोवरात आला स्वच्छ पाणी सुगंधी हवा व अल्हाददायक वातावरणामुळे त्याचे महत्त्व वाढू लागले, दूर जाणारे स्पॉन्सर स्वतःहून विनंती करू लागले जुने सभासद नव्या जोमाने परत आले नवीन आर्किटेक्ट ना आय आय ए बरोबर येण्याची इच्छा व्हायला लागली ते सभासद बनवू लागले त्यामुळे संस्थेची ताकद व कार्यक्षमतेला नवी नवलाई भेटू लागली.
हे सगळे आज लिहिण्याचे कारण म्हणजे 16 जानेवारी 2025 रोजी जे. डब्ल्यू. मॅरिएट येथे झालेला कार्यक्रम, त्या कार्यक्रमाचे स्वरूप अति भव्य या प्रकाराचे होते डोना प्रेझेंट्स डिझाईन इनक्रेडिबोल पुणे च्या आपल्या आर्किटेक्ट व डिझायनर खेळाडूंचा लिलावाचा हा कार्यक्रम अतिशय व्यावसायिक अतिशय व्यवस्थित व काळजीपूर्वक नियोजन केलेला होता या कार्यक्रमाचे थोड्या शब्दात वर्णन करणे फार अवघड आहे जेव्हा भेटू तेव्हा बोलूच.
पण या व्यतिरीक्त कार्यक्रमाचा खास फरक हा होता की आलेले सर्व डिझायनर्स हे अतिशय व्यवस्थित कपडे घालून म्हणजे पुरुष मंडळी सूट अथवा ब्लेझर घालून आले होते व स्त्रीवर्ग अत्याधुनिक पेहराव शक्यतो ब्लेझर व एक समान रंगाच्या कपड्यात शिवाय मेकअप वगैरे करून हसतमुखाने उत्साहात आली होती अगदी कॉर्पोरेट पार्टी सारखं वातावरण होतं.
खरंच टीम अचलकर व संदीप बावडेकर तुम्हा आम्हाला आमच्या मनातली ही संस्था भेटवली शिवाय येणाऱ्या काळात यापेक्षाही मोठ्या व दिमाखदार कार्यक्रमाची आशा जागवली, विकासने एक छान विचार बोलून दाखवला की सर्व कार्यक्रम फक्त ज्ञानवर्धनाचे करून उपयोग नाही तर वेगवेगळ्या विषयावर भेटत राहिलो तर आवाका वाढेल जास्तीत जास्त लोक जुळतील व संस्था अजून ताकदवान बनेल.
मला हे फारच आवडले कारण उत्सवाने उत्साह वाढतो उत्साहांना विचार समृद्ध होतात आणि विचाराने अनेक दिशा आपल्यासमोर येतात मित्रांनो आज किती बोलू किती नको या गोंधळामुळे लेख थोडासा मोठा झाला आहे पण गोड मानून घ्या.
*आपला,*
*आर्किटेक्ट उमेश देसाई*
*९८९०४८८५४८*